ऐक्याची  गरज सर्वानाच !

ऐक्याची गरज कोणाला नसते ? जंगलातले सिंह सुद्धा ऐक्य करून राहतात आणि शिकार , जीवन यापन करतात . जेवढे ऐक्य मजबूत तेव्हडे तो समुदाय विजयी  होण्याचे जास्त फायदे होतात .

मात्र काही समाज कमजोर असून , एनेकदा प्रताडित होऊन सुद्धा का ऐक्य साधू शकत नाही हा विचार करण्याचा प्रश्न आहे . विशेषतः  दलित , उपेक्षित , आदिवासी , मागास वर्गीय समाज या बद्दल हा प्रश्न सर्वाना पडतो . आंबेडकरी , रिपब्लिकन , बहुजन म्हणून ज्या समाजाकडे बघितले जाते त्या समाजाला सुद्धा हा ऐक्याचा प्रश्न भेडसावीत असतो . आंबेडकरी , रिपब्लिकन , बहुजन समाज हा बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारावर चालणार समाज त्यांचा संघटना , राजकीय पक्ष या मध्ये येतात . आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेतल्या नंतर त्यांनी ते ज्या अस्पृश्य समाजात जन्मले , त्या समाजाच्या उन्नती साठी काम करण्या साठी त्या समजला संघटित केले . स्वतःचे चारित्र्य शुद्ध  ठेवून , आपल्या ज्ञानात  अधिकाअधिक  भर पाडत आणि मोहा  पासून दूर राहून त्यांनी त्यांच्या समाजाला निर्विवाद आणि सक्षम  नेतृत्व  दिले  .

पण आज ते नाहीत आणि आंबेडकरी समाजात फार मोठी ऐक्य भावनेची उणीव दिसून येते , अनेक गट या मध्ये हा समाज विखुरला दिसून येतो , याचे काय कारण असावे ? एवढेच नव्हे तर हे गट एकदुरर्या च्या जीवावर उठलेले दिसून येतात याचे कारण काय ?

आम्हाला वाटते याचे कारण आंबेडकर विचार म्हणजे नेमके काय याची स्पष्टता नसणे हे एक कारण होय . आंबेडकरी समाज राजकारण आणि धर्म कारण या मध्ये सरमिसळ करतो हे दुसरे कारण होय , तिसरे कारण हा समाज मूलतः एका जाती , वर्गाशी जास्त निकट आहे किव्हा यांचा आहे हि भावना होय तर आंबेडकर विचार विदेशी वैदिक धर्मी ब्राह्मण यांचे बद्दल जास्त उदार आहे , उदार नाही या वर असलेले अनेक मत हे सुद्धा एक कारण आहेच शिवाय आंबेडकरी पक्ष सेकुलर आहेत का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात . त्यांचे आकलन आणि उकल झाल्या शिवाय आंबेडकरी ,रिपब्लिकन , बहुजन पक्ष , चळवळी मध्ये ऐक्य बांधणे  कठीण वाटते .

आज आपण सेकुलर  आणि आंबेडकरी पक्ष हा प्रश्न घेऊ .आंबेडकरांनी आर पी आई  ची संकल्पना  मांडल्या नंतर त्यांचे पक्षात जोशी , लोहिया , अत्रे  यावे या साठी थोडा  पत्र प्रपंच केला . आंबेडकर निधन पावले आणि पुढे हा पक्ष निर्माण झाला . पक्ष आणि धर्म हा एकाच मंचकावर दिसू लागला , संपूर्ण भारत बौद्धमय करीन हा विचार आंबेडकरांनी केला होता पण तो पक्षाच्या  मंचकावरून मांडला असता काय हा गांभीर्याने विचार करणारा मुद्धा आहे , नमो बुध्दाय, नमो भीमाय  असे करून घेतले असते काय आणि जे इतर लोक त्यांचे पक्षात आले असते मग ते मुस्लिम असो , शीख असो , जैन असो , हिंदू असो त्यांचे धार्मिक अभिवादन जसे सत श्री अकाल , नमस्कार , राम -राम , वालेकुम सलाम आदी सोडून नमो बुध्दाय केले असते काय आणि तसे असते तर त्याच्या सेक्युलारिसम  चे काय ? हा प्रश्न त्यांना सुद्धा पडला असता . बहुदा रिपब्लिकन पक्ष बदल हेच घडले असे वाटते .

सेक्युलॅरिसम हे एक तत्व आहे ते जसे इतर पक्षांना लागू आहे तसेच ते रिपब्लिकन पक्षाला यांच्या गटांना लागू आहे . सेकुलर पक्षांनी एकत्र यावे म्हणण्या पूर्वी आपण त्यात बसतो का ? हा स्वसंशोधनाचा भाग आहे !

आम्हाला वाटते रिपब्लिकन पक्षात , गटात मूलतः सेक्युलॅरिसम चा खूप अभाव आहे , आम्ही तर म्हणू रेपुब्लिकन पक्ष , गट बुद्ध धर्म वादी आहेत , ते  इतर अल्प संख्यांक धर्म जसे जैन , शीख , मुस्लिम , ख्रिस्ती यांना तर समजून घेत नाहीतच शिवाय हिंदू या बहुसंख्य  धार्मिक समजला अनावश्यक शिव्या , श्राप देत असतात . आमचाच धर्म श्रेष्ठ वगैरे वल्गना करून ते सतत इतर धर्मी लोकांवर विनाकारण टीका करीत असतात . खरी गोस्ट हि आहे कि ते नेटिव्ह  हिंदू धर्म आणि विदेशी  वैदिक ब्राह्मण धर्म यात ला फरक समजून घेत नाही , हिंदू ची खुद्द आंबेडकरांनी हिंदू कोड बिलातील  केलेली व्याख्या त्यांना मान्य नाही असे दिसते त्या मुळे हा देश जो मूळ भारतीय हिंदूंचा आहे आणि हिंदू मध्ये सर्व गैर ब्राह्मण येतात ज्या मध्ये बौद्ध , जैन , शीख हे तर आहेतच पण मूळ भारतीय ख्रिस्ती , मुस्लिम सुद्धा येतात हि सोपी गोस्ट ते भावनेच्या भरात विसरून जातात .    

रिपब्लिकन गटाच्या ऐक्याला हि फार घातक गोस्ट आहे त्या मुळे हा पक्ष जवळ पास पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य वर्गातील एक बौद्ध धर्मातरित जातीचा असे समीकरण झाले आहे .

 पूर्वी  फुले - आंबेडकर असा विचाराचा पक्ष आता बुद्ध - आंबेडकर विचाराचा पक्ष असा झाला आहे . आणि हे सत्य स्वीकारूनच आता रिपब्लिकन पक्ष गटाने ऐक्य करण्याचा प्रयत्न केला तरी पुरे .

नेटिविस्ट डी डी राऊत
विचारक ,
मूळ भारतीय विचार मंच 

Comments

Popular posts from this blog