गणतंत्र दिवस :
चिरायू हो अमर हो गणतंत्र दिन भारताचा
बहुजन राज्य शासनाचा लोक मतदानाचा " धृ"
सव्वीस जानेवारी हा दिन अति पवित्र
घटना दिली भीमाने राखू तिचे पावित्र्य
नसे कठीण राष्ट्रा अन्य कसले व्रत
रक्षू हा अमोल ठेवा सामान्य जणांचा १
लोंकांचे हे राज्य लोक कल्याणा असावे
लोकांनीच चालवावे प्रतिनिधी निवडावे
सर्वोच लोक सभा हा मानबिंदू भारताचा
चिरायू हा अमर हो गणतंत्र दिन भारताचा २
गणतंत्र शासन पद्धत जगा देन भारताची
पुरातन लोक संस्कृती हि मूळ भारतीयांची
लाडकी हि शासन रीती शाक्यमुनी गौतमाची
पुरातन हे भारत राष्ट्र नाग शिव गणांचा
चिरायू हो अमर हो गणतंत्र दिन भारताचा ३
#जनसेनानी , #Jansenani कल्याण
Comments
Post a Comment