सत्य धर्म :
घराच्या एका सुंदर खोलीत
मंदिर सर्व धर्माचे असावे
एकांत मिळताच यंदा कदा 
ध्यान शिव विपश्यनेने साधावे
डोळे अर्ध उन्मलित
नासाग्र लक्ष केंद्र बिंदू
मणक्याचे ताठ आसन
जाणिवेचा वाहे शरीर सिंधू
प्राण वायू घेता सोडता
आत बाहेर व्हावे वायू संगे
आधी फेफडे , व्ह्रदय, पोटात पाहावे
हळू हळू सुटतात शरीराचे सर्व सांधे
मन शांत जसे होते
एक एक व्याधी बाहेर येते
सुख दुःखाची जाणीव आणते
शहर अधून मधून ठणकते
तटस्थ भावे बघावे सर्व उपद्व्याप
अणु , रेणू ,प्रकाश , ध्वनीचे कंपन
नित्य अनित्याचं भान
नका अडकवू त्यात आपली मान
जेव्हा शांत सारे होते
नाभी कमल उमलते
शहस्त्रधार शीतल कारंजे
कपाडि धाव घेते सर्वांग भिजविते
क्रिया हि शिव विपश्यनेची
परम शांती त्या क्षणाची
पण नाही अनंत काळाची
जन्म मृत्यू च्या निर्वाणाची
शिव तत्व , बुद्ध वचन , कबीर वाणी
रोजच्या जीवनात चार सत्य जाणी
पंचशील , अस्थान्ग मार्ग पाळावे
दस पारमिता मार्ग एक जाणावे
तेव्हा एक मार्ग सद् धर्माचा येईल
शिव, बुद्ध, कबीर वाटाड्या होईल
अंतिम सुखाचे ध्येय साध्य करण्या
तुम्हा मानव निर्वाणा परी नेईल
सर्व योग सत्य हिंदू धर्म
ध्यान , योग् , शिव विपश्यना
कर्म योग् , धर्म मार्ग सनातन
सत्य धर्म अंतिम हाच जाणा
#जनसेनानी #Jansenani कल्याण
३ आगस्ट , २०१८

Comments

Popular posts from this blog