प्रेमा तुझा रंग कसा !

प्रेमा तुझा रंग कसा ,
तू सांगशील तसा !
तू म्हणशील ते खाईन
तू सांगशील ते गाईन
तुझ्या साठी करिन सगडे
जगात झालो जरी उघडे
प्रेम तुझा रंग कसा ,
तू सांगशील तसा !

जिथे बोलवशील तिथे येईन
तू सांगशील तिथे उडी घेईन
सोडून देईन मी आई वडिलांना
भाऊ बहिणीच्या स्नेह बंधनांना
परी तुझीच बाजू घेईन
प्रेमा तुझा रंग कसा
तू सांगशील तसा !

तू सांगशील तर शब्दांचे करिन चंद्रतारे
देईन रोमिओ ज्युलिएट लैला मजनू हिर रांझा चे उतारे
तुला हवे तर पूर्व ला म्हणीन पश्चिम
नका असेल तर उत्तर करीन तुझ्या साठी दक्षिण
प्रेमा तुझा रंग कसा
तू सांगशील तसा !

प्रेम साठी मी करिन सगळं काही
नका मला तुझी उत्तरायी
साथ दिलीस तर टाकीन जीव ओवाळून
हसशील तू एकदा तर जीव येईल मोहरून
प्रेम तुझा रंग कसा
तू सांगशील तसा !

#जनसेनानी #Jansenani कल्याण
२ जुलै , २०१८

Comments

Popular posts from this blog