फादर डे

काल फादर डे झाला
माझा पोरगा जवळ आला
म्हणाला हैप्पी फादर दे 'पपा
मी त्याच्या गालावरुन ,
डोक्यावरून हाथ फिरवला
मी थोडा तो थोडा गहिवरला

मग हलक्याच सुरात म्हणालो
का रे कोराच फादर डे
बियर नाही , रम नाही ,
व्हिस्की तरी दे
आता तू सुद्धा झाला आहेस बाप
आता आपण झालो आहोत
मित्र खास !

मागच्या वेळी आणली होती
तू ती जानी वाकरची काळी बाटली
मला माहीत आहे ,
तुन सुद्धा होती ती थोडी चाखली
नववी , दहावी पासूनच
तू घालत होतास माझी चप्पल
आता तर आपण दोघेही फादर झालो
काय असतो फादर तेही समजलो
तेव्हा मित्र म्हणूनच मला पहा
काय लागते हे पुढच्या फादर डे
येई तो वस्तर विचारीत राहा !

#जनसेनानी #jansenani कल्याण
१८ जून , २०१८

Comments

Popular posts from this blog