कोल्हाट्याचं पोर - किशोर शांताबाई काळे :

कोल्हाट्याचं पोर लावून गेलं जीवाला फार घोर !
ऐन उम्मेदीत दुर्घटनेच्या रूपानं आला तो मृत्यू चोर
वडिलांचा पत्ता नव्हता शांताबाई आईच नाव लावलं
फडा वरच्या बाईन पोराला लिहायला वाचायला धाडलं
कोल्हाटी हि जात वर्ण वेवस्थेने होती हिणवली
शूद्र , अतिशुद्राच्या पंगतीला हि जात बसविली
महार , मांग , गारुड्या सामान यांचा काम धंदा
पोटi साठी काहीही , उच्चवर्णीय ते कामंधा
जाती वर्ण चा गळ्या भोवती आहे असा घट्ट दोर
कोल्हाट्याचं पोर , लावून गेलं जीवाला घोर!

पाश्चत वैदक शास्त्र किशोर मन लावून शिकला
शांताबाई च्या परिश्रमाने एम बी बी एस झाला
समाजातील पहिला उच्च विद्या विभूषित असा आपला
काळाने अलगद असा उचलला ,रुग्ण वाहिनी कारणी झाला
मणक्याला , मेंदूला मार जबरदस्त लागला
स्वतः आयुर्वेद चिकित्सक असा तारुण्यात अकाली हरवला
समाज सेवेचा हा वारुणी असा गेला काळच्या दूर
कोल्हाट्याचं पोर , लावून गेलं जीवाला घोर !

फुले - आंबेडकरांचा त्याने मार्ग स्वीकारला
बुद्ध धम्माचा मार्ग होता त्याने अनुसरला
चिंतन , वाचन , साहित्यांतून माणूस त्याने उभा केला
कथा ,कादंबरी ,ललित लेखन चा पेन होता धरला
बहुजन हिताय , बहुजन सुखाय कार्य वाहक होता ठरला
पण नियतीच्या कठोर लेखणी पुढे तो हरला
नमस्कार त्याच्या कार्य , विचारलंi त्रिवार
कोल्हाट्याचं पोर , लावून गेलं जीवाला घोर !

#जनसेनानी #Jansenani कल्याण
११ जून, २०१८

Comments

Popular posts from this blog