नवा घ्यावा :
नाजूक भावनांचे नाजूक दुखणे
काळवळलेला चेहरा अमनस्क वागणे
डोळ्याची काळी वर्तुळे नको ते जिणे
येतात असेही क्षण विलक्षण जीवघेणे
वृदयाच्या बंद कपाटात भावना असंख्य दाटतात
मुक्या शब्दाचे बोल तोंडाला कायम टाळे ठोकतात
गळ्यात आटलेले शब्द डोक्यात काहूर माजवतात
उफाडुनि येतो दमा, गजकर्ण हे रोग वरवरचे वाटतात
घुटमळून मनाचा उल्हास पार संपतो
वाढ संपते शरीराची खुजा इथेही वाटतो
भावनांचे कडू पित्त शरीराचा दाह असा करतो
रोग असंख्य देतो शरीराचे सुख नेतो
या कुंठित भावनांचा बंधारा फेकून द्यावा
नसेल पटत विचार तर साथ हि सोडून द्यावा
जग आहे फार मोठे हे मना जना सांगावा
सूर्य -रश्मी हर कण मोकळा , नवा घ्यावा !
#जनसेनानी #Jansenani कल्याण
Comments
Post a Comment