वरात आली !

वरात आली लगबग झाली , नवरीच्या मांडवाला
सांगा ढोल वाजवायला , हो सांगा ढोल वाजवायला

उभारला नऊ डेरी मंडप , त्यास दिला झालरी साज
गुढ्या तोरणे घालून सजविला , डी जे चा घुमतो आवाज
लहान पोरं उडया मारुनी , लागले मंडप गाजवायला
सांगा ढोल वाजवायला , हो सांगा ढोल वाजवायला

नवरीच्या बापाचा फेटा , आहे दिमाखदार अन मोठा
नवरीचे काका मामा , लागले बघा लगबगीने कामा
नवरीच्या बहीण भावाची शान , आहे जणू घोड्याची मान
गावकरी मंडळी जमली सगळी , लागले फटाकडे उडवायला
सांगा ढोल वाजवायला , हो सांगा ढोल वाजवायला

नवरदेवाचा रुबाब भारी, उमद्या घोड्याची सवारी
मस्तकी शोभतो तुरा , त्याचा आनंद मावेना उरा
पाच सुहासिनी नटून आल्या , ओवाळणी काढायला
सांगा ढोल वाजवायला , हो सांगा ढोल वाजवायला

मंगलाष्टके गुजु लागली , अंतरपाट सरू लागला
नवरी सीता लाजरी , नवरा राम दिसे मनोहारी
शब्द सुमंगल कानी पडले , अक्षदा लागल्या पडायला
सांगा ढोल वाजवायला , हो सांगा ढोल वाजवायला

#जनसेनानी #Jansenani कल्याण
२८ मे ,२०१८

Comments

Popular posts from this blog