ही झोपडी परत शाकारायची :
ही झोपडी कुडाची
शेण अन मातीची
दोनतीन कोनाड्याची
मिणमिणत्या चिमणीची
ही झोपडी धुराची
जणू वाटते गुरांची
हाडकुळ्या मुलांची
अन दमल्या श्रमाची
ही झोपडी गाव वेशी वरली
ती शहरच्या नाल्या वरली
दुःख आजाराने फणफणली
गरिबीने तुडुंब मुसमुसली
ही झोपडी या आदिवाशींची
ही झोपडी मूलभारतियांची
ही झोपडी नाग नेटीवांची
ही झोपडी परत शाकारायची
#जनसेनानी #Jansenani कल्याण
२५ मे, २०१८
Comments
Post a Comment