बाल गजानन :
बाल गजानन गौरी नंदन
शिव मांडी वर बैसलें
जगत जननी त्वा कौतुकीले
बघती हलवून शिव कुंडले
गळी भुजंग हाथ लावला
चंद्र जरासा बाजूला केला
त्रिलोचन हळू स्पर्श्याने झाकिले
बाल गजानन गौरी नंदन
शिव मांडी वर बैसले
माळ रुद्राक्षी केश राशी
गंगा वाहते त्या मधून जराशी
करंगळीने त्या अडविले
बाल गजानन गौरी नंदन
शिव मांडी वर बैसले
धावत आली जगत जननी
स्तंभित झाली मनोमनी
लडिवाळें असंख्य चुंबन वर्षांविले
बाल गजानन गौरी नंदन
शिव मांडी वर बैसले
#जनसेनानी #Jansenani कल्याण
Comments
Post a Comment