निवृत्ती :

निवृत्ती चा क्षण येता जवळी
अंगावर येते उभी शिरशिरी
डोळ्यापुढे येतात ५८-६० वर्ष
दिले कधी दुःख तर कधी हर्ष

तेव्हा शिर्षासना सारखे डोके खाली वर पाय होतात
जन्माच्या वेळच्या बंद मुठी रित्या झालेल्या दिसतात
मग येतो विचार मनात काय मिळविले काय हरवले
कळले तेव्हा जे जे गवसले ,हरवले ते नव्हतेच आपले
तेव्हा कृष्ण आणि गीता ,आठवतो तो परमेश्वर पिता
अग्नी दिव्यातून गेली होती , ती आठवते रामची सीता
अन समुद्रा वरील वाळूचे बंगले अन मारलेल्या रेषा
मग डोळ्यातलं एक थेंब सांगून जातो खाली पडलेल्या मिशा

तेव्हा निवृत्ती तो क्षण निर्वाण सारखा साजरा करावा
उरलेले आयुष्य परमेश्वरी बोनस म्हणून आनंदाने जगावा
मग ठरवावे खेळू द्यायचे नाही जीवनाला ,आपण त्याचेशी खेळूया
शतकी जीवन मानून निवृत्तीची आकडे मोड करू या

शंभर उणे साठ- अठ्ठावन उरले अजुनी चाळीस बेचाळीस
नवीन जीवनाचे नवे वर्ष मानू एक एक वरीस
आता निवृत्ती प्रसवली आहे , झाला नवा जन्म
राहिल्या इच्छा , आकांक्षा, छंद करू आता संपन्न

थकलो पण हरलो नाही , हलतो पण पडलो नाही सांगू या
नव्या आयुष्याचे नवे गाणे नव्या मशाली लावू या
सूर्योदयाला उठू , वार्म अप करू , मॉर्निंग वॉक ला जाऊ या
कधी टपरी वरचा वडा पाव, चहा, कोफी, लस्सी मस्त पीऊ या

कधी रंगवू गप्पाचे फड, कधी सांगू झालो तृप्त मी सगळा
कधी खिन्न मनाला समजवून सांगू नाही मी रिता घागरा
कधी सांगू मित्रवरा, जिवलगा, सख्या,सोयऱ्या नको विसरा मज प्रियंवरा
नसेल माझे कार्य जरी मोठेसे तरी आठवण अल्पशी करा !

#जनसेनानी #Jansenani कल्याण
२६ मे, २०१८

Comments

Popular posts from this blog