लावणी : मलबार हिल :
मलबार हिल ला बांधताय बंगला
राया झोपायच्या सात खोल्या काढा
सोमवार एक , मंगळवार दुसरी
बुधवार तिसरी वर रात्र काढा
बंगल्याला सजवा मन भरून
भव्य दिव्य दिसू द्या दुरून
व्हीनस च्या मुर्त्या ग्रीक वरून आणा
मकरणा संगमरमर राजस्थान वरून
इटालियन पलंग खोलीत बसवा
चला इराणी गालिच्या वरून
मलबार हिल ला बांधलाय बंगला ---
आधी लावा प्रत्येक खोलीत फानुस
मग बघा मंद प्रकाशात बाई माणूस
फ्रांस च्या फेशन चा गाऊन पाहून
तोंडाला लाळ नको बर सोडा
नाशिक च्या अंगुरीचा झलकू द्या पेला
मलबार हिल ला बांधलाय बंगला ----
सात खोल्याची आहे मी मालकीण
बिजली सारखी कडाडून झळकीनं
अंगावर येईन , कुशीत घेईन
थांबा जरा, जरी घोडा तर्हाट झाला
तीनशे तीन ची गोळी सुटली
आता लागा कामाला
मलबार हिल ला बांधलाय बांगला ----
#जनसेनानी #Jansenani कल्याण
Comments
Post a Comment