नवा गाव पाहिला ! :

एक होता डोंगर
डोंगराच्या पायथ्याशी
होत माझं गाव
अज्ञान होत त्याच नाव

आमी सर्व गावकरी
मूळ बाळ बाया माणसं
भाजत होतो गावाचीच कणसं
गोडच वाटायची उतरणीचा फणस

मोठ्यांनी सांगितलं होत
डोंगर पलीकडे जायचं नाय
काय आहे पलीकडे
ते पाहायचं नाय

असच चाललं होत वर्षानुवर्षे
आपल्याच गावात होतो आम्ही गर्क
यालाच म्हणतात खुळे म्हातारे अर्क
नव्हता पडत आमचे जीवनात काही फार्क

काहींनी सांगितले होते
असावे समाधानी
ठेवुनी आपली नित्य
सदैव साधी राहणी

तसेच आम्ही राहत होतो
डोंगर चढून जात नव्हतो
डोंगरा पलीकडे काय आहे ते पाहत नव्हतो
गावाचीच चटणी भाकर खात होतो

काही तरुण तुर्कांची माथी भडकली
ती थेट माझ्या दारी थडकली
म्हणाले हे असे चालायचे नाही
पलीकडे गेल्या शिवाय आम्ही राहायचे नाही

डोंगर तर चढायचा नाही
म्हाताऱ्यांची खोड काढायची नाही
नकाराची री ओढायची नाही
डोंगराला गवसणी घालून पाहू होते का काही

पायथ्याला चालत डोंगर आडवा घातला
आठवडा , पंधरादिवस , महिना लागला
जेव्हा एक दिवस नवा सूर्य उगवला
तेव्हा डोंगर पलीकडे नवा गाव पाहिला !

#जनसेनानी #Jansenani कल्याण
२६ मे, २०१८

Comments

Popular posts from this blog