चिऊ आणि काऊ :
चिऊ , काऊ ची जमली गट्टी
दोघांनी मारली शाळेला बुट्टी
आठ आण्याचा चिऊ ने घेतला खाऊ
काऊ बोलतो आपण दोघे भाऊ
बोरकुट खट्टा , इमली खट्टी
काऊ च्या मनात चालल्या खटपटी
चिऊ ला दाखवू खोटी गट्टी
खाऊ बोरकुट मस्त चटपटी
चिऊ ची चोच छोटी
काऊ ची चोच मोठी
चिऊ ची मैत्री खरी
काऊ ची मैत्री खोटी
काऊ बोलला मित्रा तू छान गातोस
गाणे सोडून आधीच का खातोस
चिऊ लागली गाणे गायाला
काऊ लागली भरभर खायला
मग आला चिऊ चा मोठा भाऊ
म्हणाला काय चालले आहे ते पाहू
काऊ ने गट्टम गट केला चिऊचा खाऊ
तेव्हा भाऊ म्हणाला काऊ बरोबर नको राहू
#जनसेनानी #Jansenani कल्याण
Comments
Post a Comment