अर्धचंद्र : अर्धचंद्र का दिला राजसा काय माझा गुन्हा सांगना उगवली असती रात पुनवेची प्रियकरा थोडा थांबाना कृष्ण पक्षाचा काळोख हा संपणार होता एक दिवस विश्वासाचा हा पंधरवाडा जरा थोडा कढ काढाना अर्धचंद्र का दिला राजसा सांज वेळी चंद्र उगवतीला मंद चांदण्या रात्र साथीला तुज वीण रोज असेल माझी जिणे विहिरणीचे जाणा ना अर्धचंद्र का दिला राजसा पटले असते तुझे माझे असले समजले अंतकरणाने धागे फुलले असते चांदणे पुनवेचे प्रियकर परत हाक द्या ना अर्धचंद्र का दिला राजसा #जनसेनानी #Jansenani कल्याण १ जून , २०१८
Posts
Showing posts from May, 2018
- Get link
- X
- Other Apps
बाल गजानन : बाल गजानन गौरी नंदन शिव मांडी वर बैसलें जगत जननी त्वा कौतुकीले बघती हलवून शिव कुंडले गळी भुजंग हाथ लावला चंद्र जरासा बाजूला केला त्रिलोचन हळू स्पर्श्याने झाकिले बाल गजानन गौरी नंदन शिव मांडी वर बैसले माळ रुद्राक्षी केश राशी गंगा वाहते त्या मधून जराशी करंगळीने त्या अडविले बाल गजानन गौरी नंदन शिव मांडी वर बैसले धावत आली जगत जननी स्तंभित झाली मनोमनी लडिवाळें असंख्य चुंबन वर्षांविले बाल गजानन गौरी नंदन शिव मांडी वर बैसले #जनसेनानी #Jansenani कल्याण १ जून , २०१८