Posts

Showing posts from April, 2019
Image
नेटिविस्ट बाबासाहेब आंबेडकर ! तुम्ही त्यांना विश्व सूर्य , ज्ञान सूर्य म्हणा आम्ही म्हणतो नेटिव्ह , नेटिविस्ट ! तुम्ही त्यांना मसीहा भाग्य विधाता म्हणा आम्ही म्हणतो मूल भारतीय ! तुम्ही त्यांना बोधिसत्त्व म्हणा आम्ही मानतो घटनाकार हिंदू कोड बिल जनक नवं हिंदूंचे नवं मानक ! तुम्ही त्यांना महामानव म्हणा आम्ही मानतो बाबा आमचा माणूस आमचा पिता ! त्यांनी गांधीना म्हटले मला नाही माय भूमी देश आम्ही म्हणालो तुम्ही आदिवासी ! त्यांनी शेवटी संकपिला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आम्ही जोड दिली नेटिविस्ट देश झाला आपुला ! संजोजक : नेटिविस्ट डी डी राऊत . रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( नेटिविस्ट ) #नेटिविस्ट_रिपाई_देश_के_सिपाही !
Image
नागराज ! गणाच्या गण नायका आधी वंदू तुज नागेशा तू  भुजंग ,आदी शेषा नाग अधीपती देश्या शिव राम कृष्ण रक्षक बुद्ध  महावीर  लक्ष्मण तू अवतार , पालनहार तू तक्षक भारत रक्षक तू गणाधीश ,गणपती नागराज तू कुलपती शंकर प्रिय कंठ मती सर्व पितरा  महिमती तू सर्ववर्ण भू पती जल नभ व्यापती राज्य तुझे वृक्ष वेली धरा मस्तकी विसावली नाग मंदार नाग वासुकी पंच नाग पृथ्वीपती भीमातीरी तुझे तेज विजय स्तंभ सांगती नेटिविस्ट डी डी राऊत , संयोजक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( नेटिविस्ट ) नेटिव्ह रिपाई , देश के सिपाही ! #नागराज  कल्याण  ११ एप्रिल , २०१९ महात्मा फुले जयंती